शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने 'अशी' घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:49 IST

बिबट्या मादीने आपल्या बछड्यास रात्रीच्या सुमारास अलगद उचलून नेले. यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला.

सांगली : शिवारात शेतकऱ्यांची चाहूल लागताच बछड्यास तिथेच सोडून पळ काढलेल्या बिबट्या मादी अन् बछड्याची वनविभागाने अखेर भेट घडवून आणली. बिबट्या मादीने आपल्या बछड्यास रात्रीच्या सुमारास अलगद उचलून नेले. यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील शेतकरी शिवाजी गावडे यांच्या खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी (दि.२५) रात्री बिबट्या मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बिबट्या मादीने बछड्याला तिथेच सोडून पळ काढला. शेतकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडून आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने येऊन बछड्याला अलगद उचलून नेले. याचा व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.गेल्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. जनावरांवर तसेच लहान बालकांवरील हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्यास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी नागरिकांमधून वेळोवेळी केली जात आहे. मात्र वनविभागालाच हे बिबट्या चकवा देत आहेत. दरम्यान वाटेगाव येथील बछड्याची अन् बिबट्या मादीची वनविभागाने भेट घडवली. 

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या