बेळंकी आत्महत्येप्रकरणी एका सावकारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:13+5:302021-02-05T07:21:13+5:30
निवृत्त पोलीस हवालदार आण्णासाहेब गव्हाणे (वय ६५), त्यांची पत्नी मालन (५५) व मुलगा महेश (३०) या तिघांनी शनिवारी (दि. ...

बेळंकी आत्महत्येप्रकरणी एका सावकारास अटक
निवृत्त पोलीस हवालदार आण्णासाहेब गव्हाणे (वय ६५), त्यांची पत्नी मालन (५५) व मुलगा महेश (३०) या तिघांनी शनिवारी (दि. २३) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेअर बाजारात गुंतवणुकीत तोटा झाल्याने सावकारांनी वसुलीसाठी १४ जणांनी ८४ लाखांच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने आत्महत्या करत असल्याची महेश गव्हाणे याने लिहीलेली चिठ्ठी मिळाली आहे.
याप्रकरणी सांगली, मिरज व कर्नाटकातील १४ जणांविरुद्ध सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी संतोष मंगसुळे यास कर्नाटकातील हारूगिरी येथून मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
मंगसुळे याने महेश गव्हाणे यास ६ लाख रुपये वसुलीचा तगादा लावला होता. याप्रकरणी अन्य १३ जण फरारी असून गुन्हा दाखल असलेल्या सांगली व मिरजेतील दोन वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सांगली सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संतोष मंगसुळे यास न्यायालयाने दि. १ पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.
फोटो-२८संतोष मंगसुळे