शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली; सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार

By अशोक डोंबाळे | Updated: November 3, 2023 18:23 IST

प्रचार शिगेला : सत्ताधारी-विरोधी गटामध्ये जादूटोण्यावरून आरोप-प्रत्यारोप

सांगली : हरिपूर (ता. मिरज) ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. गावाच्या वेशीवर जादूटोणा आणि भानमतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला आणि कमानी जवळ लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. या प्रकारानंतर गावातील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले, तर ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २१८, तर सदस्यपदांसाठी ६६४ जागांसाठी १ हजार ५०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार असल्याने गावागावात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सांगली शहरानजीक असणाऱ्या हरिपूर गावामध्ये मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार निवडणुकीमध्ये पुढे आला आहे. हरिपूर गावाच्या वेशीवर गावची कमान असणाऱ्या ठिकाणी भानामती आणि जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू हळद-कुंकू टाचण्या टोचलेली बाहुली यांसह जादूटोण्याचे साहित्य कमानीच्या पायाशी ठेवल्याचे शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती लगेच राजकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांनी मात्र जादूटोणा केल्याने कोणाची सत्ता येत नाही अथवा जात नाही उलट लोक काम बघून मतदान करतात, असे आरोप करत आहेत. सदरचा प्रकाश निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी जादूटोण्यासाठी ठेवलेले साहित्य हे पेटवून टाकले. एकीकडे स्मार्ट जमान्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांमुळे चांगली चर्चा रंगली होती.

चुरशीने प्रचारविधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपेक्षा अधिक चुरशीनं ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या जातात. सांगलीतील हरिपूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे गुन्हे दाखल करा : मुक्ता दाभोलकरग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असे अघोरी प्रकार करणाऱ्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक