शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

विधानसभेला अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही - विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:47 IST

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी टिप्पणी खासदार ...

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी टिप्पणी खासदार विशाल पाटील यांनी केली.सावर्डे (ता. तासगाव) येथे आयाेजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, लाेकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही. लोकसभेवेळीच विधानसभेचे घोडेमैदान अजून लांब आहे. तेव्हा साेबत बसूनच विधानसभेचा निर्णय घेऊ.मात्र लाेकसभेत संजयकाकांना राेखायचेच, हा शब्द देऊन त्यांनी जाहीर भूमिका घेतली. त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील आहे. या प्रेमाचा परतावा कसा करायचा ते वसंतदादा घराण्याला कळते. माजी खासदार दहा वर्षात जेवढे बोलले तेवढे मी एका शपथविधीला बोललो. त्यांनी सारे देव पाण्यात घातले. पण एकही देव यावेळी त्यांना पावला नाही.

अजितराव घोरपडे म्हणाले, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने खासदार बदलले. ही मोहीम यशस्वी झाली. आमचाच खासदार व आमचाच आमदार, या भूमिकेने मतदारसंघाचे वाटोळे झाले आहे. जिल्ह्यात एक वेगळी संघटना उभी करणार आहे.

यावेळी राजवर्धन घोरपडे, स्वप्निल पाटील, डॉ. प्रताप पाटील, महादेव पाटील, आर. डी. पाटील, पांडुरंग पाटील, अरुण खरमाटे यांच्यासह शेतकरी विकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी अंजनी आणि चिंचणीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.

विशाल पाटील यांची बगलशेतकरी मेळाव्याचा एकंदरीत सूर अंजनी-चिंचणीला सक्षम तिसरा पर्याय देण्याचा होता. उपस्थितांनी अंजनीच्या नेतृत्वावरही जोरदार टीका केली. मात्र भाषणाला उभे राहिल्यानंतर खासदार पाटील यांनी २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आर. आर. आबांच्या चिरंजीवांनी मला चांगली मदत केली, असा उल्लेख केला.

मंचावर अनेकांनी भाषण केले पण माईकची व्यवस्था चांगली नव्हती आणि माझ्या कानात पाणी गेल्यामुळे सगळं नीट ऐकू आलं नाही, असा टोला लगावत मूळ विषयाला बगल दिली. याचवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील आणि निमणीचे आर. डी. पाटील यांना माजी खासदारांनी भुरळ पाडल्याचा टोमणाही लगावला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvishal patilविशाल पाटीलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024