कोकरुड पोलीस ठाण्यात कायदेविषयक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:41+5:302021-03-31T04:26:41+5:30
कोकरुड : येथील पोलीस ठाण्यामध्ये इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी वार्षिक तपासणी करत सर्व पोलिसांची शंभर गुणांची ...

कोकरुड पोलीस ठाण्यात कायदेविषयक परीक्षा
कोकरुड : येथील पोलीस ठाण्यामध्ये इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी वार्षिक तपासणी करत सर्व पोलिसांची शंभर गुणांची कायदेविषयक परीक्षा घेतली.
परीक्षेमध्ये हेमंत तांबेवाघ यांनी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक, रेखा सूर्यवंशी यांनी ९२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर वंदना पाटील, संदीप भवारी, विशाल भोसले यांनी ७६ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या सर्वांचे पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी अभिनंदन करून विविध कायदे, गुन्हे याबद्दल मार्गदर्शन केले.