शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

भूसंपादन कामांमध्ये अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:39 PM

राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.

ठळक मुद्देभूसंपादन कामांमध्ये अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणारसांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचा इशारा 

सांगली : राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठीचे भूसंपादन - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय अधिकारी मिरज डॉ. विकास खरात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूरचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम,  वाबळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस. एन. निंबाळकर, उपअभियंता म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन सांगली दि. वि. खट्टे, कार्यकारी अभियंता महावितरण एस. ए. कोळी आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज तालुक्यातील 10 व कवठेमहांकाळ तालुक्यातील सोळा अशा एकूण 26 गावांमधील भूसंपादन करण्यात आले असून या 26 गावांचे निवाड्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. तसेच संपादित जमिनीसाठी मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून तीचे वितरणही त्वरीत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेल्या ठिकाणच्या जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे त्वरीत हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये. अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज तालुक्यातील बामणी, निलजी, अंकली, इनामधामणी, टाकळी, भोसे, पाटगांव, कळंबी, मिरज व मालगाव तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी, देशिंग, लांडगेवाडी, केरेवाडी, निमज, हरोली, जाखापूर, बोरगांव, अलकूड एम, घोरपडी, आगळगांव, कुची, नागज, शेळकेवाडी, शिरढोण, जाधववाडी या गावांतील भूसंपादन करण्यात आले असून निवाड्यानुसार मंजूर रक्कमचे वितरण प्राधान्याने करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या अनुषंगीक कामांसाठी महसूल यंत्रणा तयार ठेवावी. ज्या कामांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. युटीलिटी शिफ्टींगबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.रस्ते कामांबरोबरच 22 तलावातील गाळही निघणार - डॉ. अभिजीत चौधरीपाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने या अभियानाची सांगड महामार्ग विकास कार्यक्रमाशी घालण्याचे निश्चित केले आहे. यामधून जलसंधारणाच्या कामांबरोबरच महामार्गांच्या कामांसाठी लागणारा मुरूम व मातीही उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ची कामे करीत असताना जिल्ह्यातील बोरगाव, शिरढोण, जाधववाडी, कुची, आगळगाव, जाखापूर, शेळकेवाडी, केरेवाडी, ढालगाव, आरेवाडी, रायवाडी, निमज या ठिकाणच्या एकूण 22 तलावातील गाळ व मुरूम काढण्यात येणार आहे. सदरची कामे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेवूनच करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली