शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे काँग्रेस सोडली - पृथ्वीराज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:37 IST

सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये

सांगली : काँग्रेस पक्षाचे प्रामणिकपणे काम केले. सर्व जबाबदारी पार पाडली. २०१९ आणि २०२४ या विधानसभेमध्ये पक्षातूनच स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे पराभव झाला. तरी सारे विसरून काम करण्यास तयार होतो. परंतु, प्रदेशाध्यक्ष व पक्षनेतृत्वाकडून पुन्हा २०२९ असे घडणार नाही असा शब्द दिला नाही. तसेच स्थानिक नेतृत्वाने तुम्ही आता महापालिकेत नेतृत्व करा विधानसभेला आमच्याच घरातला उमेदवार असेल असे म्हणत विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, अशी टीका काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.पृथ्वीराज पाटील यांनी नुकतेच मुंबई येथे भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांनतर त्यांनी पहिल्यांदाच सांगलीत सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजप पक्ष प्रवेशाबद्दलची सविस्तर भूमिका मांडली. पृथ्वीराज पाटील म्हणाले, माझे वडील गुलाबराव पाटील व मला काँग्रेस पक्षाने भरपूर दिले. आम्ही दोघांनी आमची जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडत पक्षासाठी अहोरात्र काम केले. माझ्या वडिलांनाही तेव्हा काँग्रेसमध्ये भरपूर त्रास झाला. परंतु तो संघर्ष व मतभेद बाजूला ठेवून मागील दहा वर्षांपासून काँग्रेससाठी सर्व काही दिले. २०१९ च्या विधानसभेत अत्यंत कमी फरकाने पराभव झाला. यानंतर मी पुन्हा सक्रियपणे काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून काम केले. २०२४ च्या लोकसभेला सांगलीची जागा मिळावी यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो. खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु विधानसभेला मला उमेदवारी मिळाली असताना माझ्या समोर बंडखोरी केली. दुसऱ्यावेळी विश्वासघातामुळे माझा पराभव झाला. माझे कार्यकर्ते खचले होते. तरी त्यांना सावरून मी काँग्रेसचे कार्य करत होतो. पण, मला राज्य नेतृत्वाने पुन्हा २०२९ माझ्यासोबत असे घडणार नाही याची हमी दिली नाही. पुढील विधानसभेला पुन्हा दगा फटक्याने पराभव होण्यापेक्षा सांगली विकासासाठी सत्तेसोबत जाणे मला पटल्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेचे नेतृत्व करण्याचा सल्लापुढील विधानसभेला आमच्या घरातीलच उमेदवार असणार आहे. तुम्ही दोनवेळा पराभूत झाला असल्यामुळे आता महापालिकेत नेतृत्व करा, असा सल्ला स्थानिक नेतृत्वाने दिला. अशा पद्धतीने सातत्याने माझा विश्वासघात केला असे नाव न घेता खासदार विशाल पाटील यांच्यावर पृथ्वीराज पाटील यांनी टीका केली.

सपकाळ, विश्वजित यांच्याशी चर्चादोन्ही विधानसभेला स्थानिक नेतृत्वामुळे मला पराभूत व्हावे लागले. पुन्हा २०२९ च्या निवडणुकीत मागील पुनरावृत्ती यांची हमी मी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विश्वजित कदम यांच्याकडे मागितली. मात्र त्यांनी त्याचे उत्तर ठामपणे देणे टाळल्याचे पृथ्वीराज पाटील म्हणाले.