जागतिक कर्करोग दिनानिमित्त निर्मल व्यसनमुक्ती केंद्रात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:56+5:302021-02-07T04:24:56+5:30
मिरजेत निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. प्रकाश गुरव बाेलत हाेते. ते ...

जागतिक कर्करोग दिनानिमित्त निर्मल व्यसनमुक्ती केंद्रात व्याख्यान
मिरजेत निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. प्रकाश गुरव बाेलत हाेते. ते म्हणाले, कर्करोग ज्या कारणांमुळे किंवा घटकांमुळे उद्भवतो त्याच्यापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तंबाखू व धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, गाल, ओठांचे कॅन्सर, अन्ननलिका व घशाचा कॅन्सर होतो. जिभेवर गालावर तपकिरी लालसर चट्टा पडतो. धूम्रपानामुळे श्वासनलिकेत दीर्घकालीन दाह व दीर्घकाळ खोकला होऊ शकतो. गरोदर मातेने तंबाखूचा, सिगारेटचे वापर केल्यास त्याचा गर्भावर परिणाम होऊन गर्भाची वाढ खुंटते. तंबाखूमुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन रक्तवाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार किंवा मेंदूचा झटका येऊ शकतो. अति मद्यपानामुळे यकृताच्या कर्करोगासोबत तोंडाचा, घशाचा कर्करोग होतो. दारू पिणारे बहुतांशी लाेक सिगरेट व तंबाखूचे शौकीन असतात, हे अधिक घातक आहे. व्यसने टाळून कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.
निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डाॅ. चंद्रशेखर हळींगळे म्हणाले व्यसनावर उपचार पद्धती उपलब्ध आहे. निर्मल हॉस्पिटलमध्ये व्यसनाची इच्छा होऊ नये. यासाठीं व अचानक व्यसन बंद झाल्यास भीती वाटणे. धडधडणे. झोप न लागणे, शौचास न होणे असा त्रास होऊ नये. यासाठीही औषधोपचार करण्यात येतात. काही मानसिक आजार किंवा व्यसनासाठी औषध उपचार उपलब्ध आहेत.
विनायक कवडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डाॅ. निशा हळींगळे, डाॅ. दीपक मुकादम, डाॅ. प्रकाशकुमार मोरे, सागर जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. डाॅ. श्रद्धा गायकवाड यांनी आभार मानले.
फाेटाे : ०६ मिरज १