आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:47+5:302021-09-15T04:31:47+5:30
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाेते. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी स्वागत केले. डॉ. अजित ...

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाेते. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी स्वागत केले. डॉ. अजित पाटील म्हणाले की, १५ ते २९ या वयोगटांत होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असून, युवा पिढी मानसिकदृष्ट्या खचत चालल्याचे हे लक्षण घातक आहे. कौटुंबिक समस्या, नोकरीविषयक समस्या, मानसिक ताण, चिंता, नैराश्य, अपुरा संवाद, ड्रग्सचा अतिवापर या कारणातून आत्महत्या होतात. प्रत्येकाने मित्र बनून आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी सुसंवाद साधला पाहिजे, अशा व्यक्तींच्या वर्तनातील बदल समजून घेऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत मिळवून दिली पाहिजे.
या वेळी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी, डॉ. माधुरी देशमुख यांनी संयोजन केले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी आभार मानले.