सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार आणि पाठिंब्याचा खेळ सुरू झाला आहे. काटाजोड लढती असणाऱ्या मतदारसंघांत एकेक मतासाठी रस्सीखेच सुरू असून, उमेदवारांनी गठ्ठा मतदानावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या स्थितीत मतदानाची गोळाबेरीज करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. कोणत्या भागातून गठ्ठा मतदान मिळेल आणि कोणत्या भागातून मतदान फुटण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास सुरू आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात अपक्षांची संख्याही मोठी आहे. या अपक्षांनी मते खाल्ल्यास आपल्याला पराभवाचा दणका बसू शकतो, अशी भीती उमेदवारांना आहे.अशा अपक्षांना ऐनवेळी आपल्याकडे वळवून घेण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यातूनच जिल्हाभरात माघार आणि पाठिंब्याचा खेळ रंगू लागला आहे. अनेक मतदारसंघांत अपक्षांनी माघार घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याची पत्रके निघू लागली आहेत. अर्थात, अपक्षांच्या माघारीसाठी काय सेटलमेंट झाली, हे मतदार चांगलेच जाणून आहेत.
मिरज पूर्व भागातील दिग्गज नेत्याने गेल्या सहा महिन्यांपासून एका प्रस्थापित पक्षासाठी गावात प्रचार केला. पक्षनेत्याच्या जाहीर सभादेखील घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे पॅनल उभे केले. पण, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाकडून किंवा पक्षनेत्याकडून रसद मिळेना झाल्यावर रिंगणातून माघार घेतली. तीनही उमेदवारांसह दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर सध्या तो विरोधी पक्षाच्या जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर दिसत आहे.जतमध्ये निवडणुकीत अर्ज भरुन माघारीसाठी भरभक्कम घबाड मिळविण्याच्या नियोजनात असलेल्या एका उमेदवाराला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. अधिकृत उमेदवाराकडून माघारीसाठी कोणतीही विनंती न आल्याने स्वत:हून त्याने माघार घेत एका पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला. आपल्या समर्थक मतदारांनी त्याला भरभरून मते द्यावीत, असे आवाहन तो करू लागला आहे.बंडखोरांना स्वीकृतचे आमिषजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत स्वीकृत सदस्य घेण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याचा दाखला देत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना माघारीच्या रिंगणात ओढण्याचे पक्षनेत्यांकडून सुरू झाले आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसात अपक्षाला माघार घ्यायला लावून प्रचारात सोबत फिरविण्याचे नियोजन आहे.
Web Summary : Sangli ZP election sees strategic withdrawals and support shifts. Candidates focus on securing bloc votes, attempting to sway independents with promises amid close contests. Rebel candidates are being enticed with nominated positions.
Web Summary : सांगली ZP चुनाव में रणनीतिक रूप से समर्थन और वापसी जारी है। उम्मीदवार गुट मतदान हासिल करने पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। करीबी मुकाबले के बीच बागियों को मनोनीत पदों का प्रलोभन दिया जा रहा है।