कोरोनात नेत्यांना बोरगावचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:13+5:302021-05-31T04:20:13+5:30
बोरगाव : कोरोनात नेत्यांना बोरगाव (ता. वाळवा) गावचा विसर पडला आहे. परिसरात ११३० रुग्ण सापडले. यात ३८ जणांचा बळी ...

कोरोनात नेत्यांना बोरगावचा विसर
बोरगाव : कोरोनात नेत्यांना बोरगाव (ता. वाळवा) गावचा विसर पडला आहे. परिसरात ११३० रुग्ण सापडले. यात ३८ जणांचा बळी गेला. मात्र तालुका व जिल्हा पातळीवरील एकही नेता आजअखेर फिरकलेला नाही.
बोरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना रुग्णसंख्येत तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने बोरगाव हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष उभारला आहे. मात्र तेथे भेट द्यायला नेतेमंडळींना वेळ नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांनी गावाला दोनदा भेटी दिल्या आहेत.
खासदार धैर्यशील माने निवडणुकीनंतर आजअखेर कोणालाच दिसलेले नाहीत. पालकमंत्री पाटील हेही स्वत: या काळात आलेले नाहीत.
शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत टीव्हीवर दिसतात, मात्र बोरगावला त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. या नेत्यांनी गावात तात्पुरते रुग्णालय कोविड सेंटर उभारलेले नाही.
मतदानाला गाडी पाठवणारी मंडळी आता कुठे गेली, असे जनता विचारत आहे.