लक्ष्मणराव जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST2021-04-21T04:27:35+5:302021-04-21T04:27:35+5:30

मिरज : मिरजेतील यशवंत सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार समिती मिरजचे माजी अध्यक्ष, कॉम्रेड लक्ष्मणराव ...

Laxmanrao Jadhav passed away | लक्ष्मणराव जाधव यांचे निधन

लक्ष्मणराव जाधव यांचे निधन

मिरज : मिरजेतील यशवंत सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार समिती मिरजचे माजी अध्यक्ष, कॉम्रेड लक्ष्मणराव जाधव (वय ८२) यांचे मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातू, सुना असा परिवार आहे. मिरजेचे तत्कालीन आमदार डॉ एन.आर. पाठक यांच्या नेतृत्वाखाली मिरज शासकीय रुग्णालय, मिरज रेल्वे जंक्शन, मिरज-अर्जुनवाड पूल, मराठे मिल कामगारांची चळवळ, तत्कालीन मिरज नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनात ते सहभागी होते. शासकीय रुग्णालय मिरजेत व्हावे यासाठी त्यांनी माेठा संघर्ष केला हाेता. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना अनेक निराधार वृद्धांना पेन्शन मंजूर करून त्यांना मदत केली. रेवणी गल्ली मुस्लीम समाजाशी त्यांचा जवळचा संबंध होता. रेवणी मोहल्ला जमातीच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते. रेवणी मोहल्ला जमातीतर्फे काॅम्रेड लक्ष्मणराव जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Laxmanrao Jadhav passed away