शिराळे खुर्दच्या उपसरपंचपदी लक्ष्मण सुर्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST2021-02-13T04:25:09+5:302021-02-13T04:25:09+5:30
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील उपसरपंचपदी लक्ष्मण हरी सुर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ...

शिराळे खुर्दच्या उपसरपंचपदी लक्ष्मण सुर्ले
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील उपसरपंचपदी लक्ष्मण हरी सुर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचा कार्यक्रम पार पडला.
शिराळे खुर्द ग्रामपंचायतीत आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख गटाची सत्ता आहे. लक्ष्मण सुर्ले यांनी याअगोदर दहा वर्षे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम पाहिले आहे. आता त्यांना प्रथमच उपसरपंच पदाची संधी देण्यात आली आहे. निवड कार्यक्रमावेळी सरपंच किरण पाटील, ग्रामसेवक वाय. के. नाईक, शोभा पाटील, ‘प्रचिती’चे संचालक लक्ष्मण पाटील, लीलावती सुतार, गणेश पाटील, ग्रा. पं सदस्य विवेक खिलारे, हिराबाई पाटील, रामचंद्र खिलारे व संदीप कांबळे, गणेश काळे, लक्ष्मण मोरे, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.
फोटो - १२लक्ष्मण सुर्ले