बारा बलुतेदार महासंघ जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:10+5:302021-08-28T04:31:10+5:30
बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण देसाई यांचा सत्कार दत्तात्रय घाडगे, शशिकांत गायकवाड, अनिल काशिद, कमलाकर काळे, बाळासाहेब अस्वले यांच्या ...

बारा बलुतेदार महासंघ जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण देसाई
बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण देसाई यांचा सत्कार दत्तात्रय घाडगे, शशिकांत गायकवाड, अनिल काशिद, कमलाकर काळे, बाळासाहेब अस्वले यांच्या उपस्थितीत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण देसाई यांची निवड झाली. राज्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या सूचनेनुसार निवड झाली. निवडीबद्दल समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नाभिक संघटनेचे संघटक शशिकांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष अनिल काशिद, ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र माळी, शरद झेंडे, कमलाकर काळे, अशोक सपकाळ, बाळासाहेब अस्वले, कुंभार समाजाचे नेते बाळासाहेब कुंभार, महेश सुतार, सांगली सलून असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खंडागळे, श्याम जाधव, सागर चिखले आदी उपस्थित होते. लक्ष्मण देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील बारा बलुतेदार घटकांना सोबत घेऊन काम करू. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू. जिल्हा व तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहोत.