पावणे तीन लाखाचा बेदाणा केला लंपास

By Admin | Updated: August 31, 2014 23:49 IST2014-08-31T22:45:26+5:302014-08-31T23:49:57+5:30

गुन्हा दाखल : ठेकेदार, कामगारावर संशय

Laxa made three grams of curd | पावणे तीन लाखाचा बेदाणा केला लंपास

पावणे तीन लाखाचा बेदाणा केला लंपास

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील एका बेदाणा वॉशिंग युनिटमधून २ लाख ८५ हजार रूपये किमतीचा बेदाणा चोरट्यांनी पळविला आहे़ आज (रविवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ याप्रकरणी बेदाणा व्यापारी राजेश आबालाल पटेल (रा़ सांगली) यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे़ यामध्ये त्यांनी ठेकेदार अलगोंडा मुताप्पा हुकडी व त्याच्या साथीदार कामगारावर संशय व्यक्त केला आहे़
मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नंबर बी- ७ /१५ हा भाऊ जोशी यांच्या मालकीचा आहे़ त्याठिकाणी असलेले गोदाम राजेश आबालाल पटेल यांनी वॉशिंगसाठी भाड्याने घेतले होते़ त्यांचा हा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता़ १३ आॅगस्ट रोजी पटेल यांच्या या युनिटमध्ये ९० बॉक्स बेदाण्याचे वॉशिंग करण्यात आले होते़ त्याची किंमत २ लाख ८५ हजार रूपये होती़ दरम्यान, ठेकेदार अलगोंडा मुताप्पा हुकडी, रमेश मल्लाप्पा रोगे (सध्या दोघेही रा़ सावळी, मूळ रा़ तावशी, जि़ बेळगाव) हे दोघे त्या रात्री वॉशिंग युनिटमध्ये झोपले होते. दुसऱ्यादिवशी सकाळी मालक पटेल हे नेहमीप्रमाणे युनिटमध्ये आल्यावर त्यांना वॉशिंग केलेला बेदाणा दिसला नाही़ हवालदार रमेश जाधव तपास करीत आहेत़ (वार्ताहर)

संशय बळावला...
युनिटच्या खिडकीचे गज तोडून बेदाण्याची चोरी झाल्याचे मालकांना हुकडी व त्याच्या साथीदाराने दाखविले़ तेव्हापासून ते दोघे फरारीही झाले होते़ त्यामुळे त्यांच्यावरचा संशय बळावला होता़ त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने आज पटेल यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात जाऊन दोघा संशयितांविरूध्द बेदाणा चोरीविषयीची फिर्याद दाखल केली.

Web Title: Laxa made three grams of curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.