शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:55 IST

पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी

सांगली : विटा येथील वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकील सांगलीत एकवटले. त्यांनी कामापासून अलिप्त राहत घटनेचा निषेध नोंदवला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन दिले. वकील कुंभार यांना मारहाण करून घरातील ‘डीव्हीआर’ मशीन चोरणाऱ्या पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.विट्यातील वकील कुंभार यांच्या घराजवळ हद्दपार गुन्हेगार राहत असल्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून ८ ते १० पोलिस रात्री येऊन सेल्फी काढणे, मोठमोठ्याने दंगा करणे असे कृत्य करत होते. याबाबत त्रास होत असल्यामुळे कुंभार व परिसरातील नागरिकांनी तक्रार केली होती.त्याचा राग मनात धरून शनिवारी रात्री आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील अर्ध्या कपड्यातच पोलिस गाडीत घालून शिवीगाळ करून फरफटत ठाण्यात नेल्याची कुंभार यांची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिसांवर कारवाईसाठी विट्यात वकिलांनी मोर्चा काढला. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. बुधवारी सर्व तालुक्यांतील वकील संघटनांचे पदाधिकारी सांगलीत एकवटले. त्यांनी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला.शेकडो वकिलांनी कामापासून अलिप्त राहत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन कारवाईची मागणी केली. वकिलांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वकील विशाल कुंभार यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली. शिष्टमंडळातील वकिलांनी कारवाईची मागणी केली. अधीक्षक घुगे यांनी याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोकराव वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव, ॲड. सी.डी. माने, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार, ॲड.सुनील दोषी, ॲड. सविता शेडबाळे, विटा येथील ॲड. शौर्या पवार, ॲड. शैलेश हिंगमिरे, ॲड. दीपक शिंदे, ॲड. विक्रांत वडेर, ॲड. सर्जेराव मोहिते, ॲड. संदीप मुतालिक आदींसह वकील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. अधीक्षक कार्यालयानंतर वकिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.अधीक्षक कार्यालयातच निषेध फलक झळकलापोलिस अधीक्षक कार्यालयात शेकडो वकील एकवटल्यानंतर कार्यालयाच्या आवारातच विटा पोलिस ठाण्याचा जाहीर निषेध असा फलक झळकवण्यात आला. शेकडो वकिलांच्या गर्दीतील हा फलक लक्ष वेधून घेत होता.विशाल कुंभार यांना अश्रू अनावरविटा पोलिसांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचताना विशाल कुंभार अश्रू रोखता आले नाहीत. आंदोलन थांबवा नाहीतर विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी पोलिसांनी दिल्याचे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सांगितले.