सांगली बाजार समितीत नवीन हळद सौद्यांचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:40+5:302021-02-05T07:32:40+5:30
सांगलीत बाजार समितीत नव्या हळद सौद्यांचा प्रारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी व्यापारी मनोहर सारडा, सुरेश पाटील. लोकमत ...

सांगली बाजार समितीत नवीन हळद सौद्यांचा प्रारंभ
सांगलीत बाजार समितीत नव्या हळद सौद्यांचा प्रारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी व्यापारी मनोहर सारडा, सुरेश पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील बाजार समितीत नवीन हळद सौद्यांचा प्रारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सोमवारी सकाळी झाला. गणपती जिल्हा कृषी-औद्योगिक सोसायटीत हा कार्यक्रम झाला. बावची (ता. वाळवा ) येथील हळद उत्पादक शेतकरी सतीश विष्णू कोकाटे यांच्या राजापुरी हळदीला ११२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
हळद सौद्यामध्ये कमीत कमी ५००० व जास्तीत जास्त ११२०० इतका दर पहिल्या दिवशी मिळाला. व्यापारी प्रतिनिधी संचालक शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, हमाल प्रातिनिधी बाळासाहेब बंडगर, संचालक जीवन पाटील, अडत व्यापारी मनोहर सारडा, गोपाळ मर्दा, माजी महापौर सुरेश पाटील, सत्यनारायण अटल, मधुकर काबरा, राजेंद्र मेणकर, हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, हळद सौदे विभाग प्रमुख एम. के. रजपूत यांच्यासह अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते.
सभापती पाटील यांनी आवाहन केले की, नव्या हंगामात हळदीला चांगला दर मिळू लागला आहे. सांगलीच्या हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने जगभरातून मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी. विविध बॅंकांतर्फे हळद व बेदाणा शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू आहे, तिचाही लाभ घ्यावा.