कृषी औजारे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:04+5:302021-03-13T04:50:04+5:30

विटा : कृषी औजारे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक ...

Launch of MahaDBT portal for agricultural implements grant | कृषी औजारे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू

कृषी औजारे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू

विटा : कृषी औजारे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक फार्मर कंपनीचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे यांनी केले.

विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, महाडीबीटी फार्मर पोर्टलवर पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी अजून नोंदणी केली नसेल तर पोर्टल सुरू करण्यात आले आहे. बरेच शेतकरी या ऑनलाईन पद्धतीमुळे वंचित राहिले होते. आता चौथ्यांदा ही सेवा सुरू होत आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्याची सोडत झाली असून ती नावे लाभार्थी शेतकऱ्यांना विटा येथील शिवप्रताप अ‍ॅग्रोटक शेतकरी उत्पादक कंपनीच्या मॉलमध्ये पाहावयास मिळतील.

त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यांनी जी शेती औजारे मंजूर झाली आहेत ती औजारे म्हणजे चाफ कटर, रोटर, टिलर, मल्चर पलटी, मळणी मशीन तसेच सर्व औजारांची मोठी रेंज शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक मॉलमध्ये उपलब्ध आहेत. सांगली जिल्ह्यात ज्यांना ज्यांना औजारे मंजूर आहेत. त्यांनी त्वरीत विटा येथील शिवप्रताप अ‍ॅग्रोमॉल येथे संपर्क साधावा तसेच ज्यांना ठिबक सिंचन मंजूर झाली आहेत. त्यांनीही संपर्क साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी शेती औजारे, शेततळे, ठिबक सिंचन यासाठी नोंदणी करण्यासाठी शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे यांनी केले.

Web Title: Launch of MahaDBT portal for agricultural implements grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.