शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 15:48 IST

पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.

ठळक मुद्देपद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकरपूरग्रस्त पद्माळे गावाला भेट

सांगली : संकटाच्या काळात सांगलीकरांनी लातूरला ट्रेनव्दारे पाणीपुरवठा करून फार मोठी मदत केली आहे. लातूरकर सांगलीकरांचे ऋणी आहेत. सांगलीकरांशी आमचे भावनिक नाते आहे. त्यामुळे एक लातूरकर म्हणून मी येथे आलो आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पद्माळे गावची जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आदर्शवत आहे.

पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.मिरज तालुक्यातील पूरग्रस्त पद्माळे या गावाला भेट देवून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, सरपंच सचिन जगदाळे, ग्रामस्थ उपस्थित होते.संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, पुरामुळे पद्माळे गावचे शेती, घरांचे, शाळा, प्रापंचिक साहित्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत आहे. पुरामुळे पद्माळे गाव दहा वर्षे मागे पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान, व्यवसायाचे नुकसान कशा प्रकारे सुधारता येईल, पद्माळे गाव पुन्हा नव्या उमदीने व जोमाने उभे करण्यासाठी व लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असून लातूर प्रशासनातील अधिकारी यांना पद्माळे गावास भेट देवून लोकांशी संवाद साधून सर्व्हे करण्यासाठी निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आदर्शवत असून एक वेगळा एज्युकेशन हब करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. शासना व्यतिरिक्त लातूरकरांच्या वतीने एकमेकांशी संवाद साधून, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक कामे 1 वर्षात पूर्ण करू. झालेल्या कामाबद्दल संवाद व चर्चा करण्यासाठी पुन्हा पद्माळे गावास भेट देवू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.ग्रामपंचायत पद्माळे येथे बैठक घेवून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेवून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पद्माळे गावातील पडझड झालेल्या घरांची, शाळेची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. सरपंच सचिन जगदाळे यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरShivajirao Patil Nilangekarशिवाजीराव पाटील निलंगेकरcollectorजिल्हाधिकारी