तासगावात पावणेतीन तोळ्याचे दागिने लंपास
By Admin | Updated: June 7, 2014 00:20 IST2014-06-07T00:17:53+5:302014-06-07T00:20:42+5:30
बॅगेवर डल्ला : बसस्थानकावरील प्रकार

तासगावात पावणेतीन तोळ्याचे दागिने लंपास
तासगाव : येथे एसटी बसस्थानकात महिलेच्या प्रवासी बॅगेतून पावणेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख साडेतीन हजार रुपयांचा ऐवज अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली. सोनाली दिनकर शिर्के (रा. मोरगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनाली शिर्के यांना बसमध्ये बसल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. आज (शुक्रवारी) दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली.
सोनाली शिर्के तासगावात लग्नसमारंभासाठी आल्या होत्या. दुपारी घरी कवठेमहांकाळकडे जाण्यासाठी त्या तासगाव-कवठेमहांकाळ बस क्र. एमच१२ सीएच ७९७५ मध्ये बसल्या. बसला गर्दी होती.
प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स ठेवलेली प्रवासी बॅग उघडली. तेव्हा बॅगेची चेन आधीच उघडल्याचे लक्षात आले. त्यातील त्यांचे मंगळसूत्र (२.५ तोळे), कानातील रिंगा (३.५ गॅ्रम) व रोख ३ हजार ५०० रुपये गायब झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांनी तपासही केला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. (वार्ताहर)