शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्व. वसंतदादा पाटील स्मारक भवन विकासासाठी ४ कोटी ८२ लाख निधीसाठी मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 12:10 IST

Vasantdada Patil Sangli-स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील स्मारकाच्या शिल्लक कामासाठी ४ कोटी ८२ लाख रुपये एवढ्या निधीला आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री, डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देस्व. वसंतदादा पाटील स्मारक भवन विकासासाठी ४ कोटी ८२ लाख निधीसाठी मान्यताराज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी

सांगली : स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील स्मारकाच्या शिल्लक कामासाठी ४ कोटी ८२ लाख रुपये एवढ्या निधीला आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री, डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.माजी मुख्यमंत्री स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील याबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी केली आहे.

डॉ. वसंतदादा पाटील यांना मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची तसेच सामान्य जनतेची सांगली व राज्यामध्ये फार मोठी संख्या आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध झाल्याने उर्वरीत कामे पुर्ण करण्यासाठी गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज असे ग्रंथालय, अभ्यासिका, कलादालन, विस्तार कक्ष, प्रशासकीय कक्ष आदी अपुर्ण असलेल्या कामाना गती मिळणार आहे. या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सांगली महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, डॉ. अभिजीत चौधरी यांनी आतापर्यंत स्मारकासाठी जवळपास 12 कोटी खर्च झाला असून ज्या सुविधा पुर्ण झाल्या आहे, त्या जनतेसाठी खुल्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने 150 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध झाली आहे असे डॉ. चौधरी यांनी बैठकी दरम्यान सांगितले.यावेळी या बैठकीत बोलताना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, स्व.वंसतदादा पाटील यांचे राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय आदी क्षेत्रातील कार्य हे निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे आहे. स्व. वसंत दादांच्या स्मारकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच राज्यातील नव युवकांना कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल.यावेळी या बैठकीला आ.विक्रम सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव ज.ना.वळवी, व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कार्यकारी अभियंता, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, खाजगी सचिव, संपत डावखर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Vasantdada Patilवसंतदादा पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली