शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘झुकेगा कौन?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:51 IST

निवडणुकीबाबत अद्यापही महाविकास आघाडीबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत गतवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून तडजोड न झाल्याने आघाडीत बिघाडी झाली आणि पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. यावेळी होणाऱ्या निवडणुकीबाबत अद्यापही महाविकास आघाडीबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्हीतील कार्यकर्ते इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत ‘झुकेगा कौन?’ असा प्रश्न उपस्थित होत असून, याच प्रश्नाच्या उत्तरावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

पाच वर्षांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सुसाट होता. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी करून लढण्यासाठी अनेकदा काथ्याकूट झाला. मात्र, दोन्ही पक्षांत एकमत झाले नाही. अखेरच्या क्षणी चर्चा फिसकटली आणि भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडली. काठावरच्या नगराध्यक्षपदासह पालिकेत भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादीची संधी थोडक्यात हुकल्याने पाच वर्षे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे शल्य बोचत राहिले.

काँग्रेसकडूनदेखील तडजोड झाली तर महाविकास आघाडी अन्यथा स्वबळावर, अशी तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी झाली तर भाजपला सत्तेतून पायउतार करणे सोपे जाईल, असे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या त्रांगड्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी ‘झुकेगा कौन?’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 

राष्ट्रवादी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सत्तेत यावा, अशी आशा आहे. त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. मात्र, विरोधी राष्ट्रवादीची नेमकी भूमिका स्पष्ट नाही. कवठेमहांकाळच्या निवडणुकीनंतर नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा दिला जाणार की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविला जाणार याबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही.

टॅग्स :Sangliसांगली