शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

By घनशाम नवाथे | Updated: September 18, 2024 19:23 IST

पदाधिकारी, लाईट मालकासह ३३ जण कारवाईच्या फेऱ्यात

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून लेसर लाईटचा मारा करणाऱ्या दहा गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लाईट मालक यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दहा मंडळांचे पदाधिकारी आणि लाईट मालक अशा ३३ जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाणे आणि संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा होत आहेत. नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बंदीची मागणी केली. कोल्हापुरात कार्यकर्त्याच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर तेथे बंदी आदेश लागू केला. त्यामुळे सांगली पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून बंदी आदेश लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी १४ सप्टेंबरपासून लेसर लाईटचा मिरवणुकीत वापर करण्यास बंदी घातली. त्याचा आदेश प्रसिद्ध केला.जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश झुगारून सांगलीत नवव्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये काहींनी लेसर किरणांचा मारा केला. त्याबाबत पोलिसांनी नोंदी घेत, व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी नऊ मंडळांचे पदाधिकारी, संजयनगर पोलिसांनी एका मंडळाविरुद्ध कारवाई केली. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले. एकूण ३३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखलशिवमुद्रा मंडळ- शुभम सतीश शिरगावकर, अफताब बागवान, ईगल मंडळ- सुमित कुंभोजकर, रोहित दत्तात्रय कोळी, रियालन्स डिजिटल- शिवम श्रावण जाधव, सूर्यकांत पाटील, विश्वसंघर्ष मंडळ- नितीन किसन कलगुटगी, नीलेश शिवाजी कलगुटगी, अष्टविनायक मंडळ- विशाल आप्पासाहेब वडर, संजय सिद्धू वडर, जगदंब युवा प्रतिष्ठान- मोसीन फकीर जमादार, बलभीम मंडळ- पारस सदाशिव दोडमणी, रमेश दिलीप आवळे, स्वस्तिक चौक- गणेश महादेव जाधव, दीपक महादेव माळी, स्वागत मंडळ- गणेश आनंदराव सटाले, सुधाकर सूर्यकांत चंदनशिवे, एकता मंडळ- ऋषिकेश दशरथ शिंदे, वैभव खोत.

या लेसर मालकांवरही कारवाईसागर शिवाजी जगताप, शामराव नागे, ओंकार कोठावळे, अभिषेक महादेव खेमलापुरे, ओंकार दत्तात्रय गवंडी, सुशांत सुभाष देसाइॅ, अभिजित अशोक माळी, वासुदेव सुनील कांबळे, वैभव राजेंद्र मुंडे, मनोज अनिल घाटगे, निखिल किरण परदेशी, सोमनाथ धडे, सोहेल गौस मोमीन

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस