शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दरीबडची येथे अंगणवाडीत शिजविलेल्या भातात सापडल्या अळ्या, पालकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:13 IST

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारातील भातात अळ्या सापडल्या. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. ...

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारातील भातात अळ्या सापडल्या. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. ही घटना सोमवार (दि.७) रोजीच्या मध्यान्ह भोजनात घडली. अंगणवाडी क्र: १३१ मध्ये २० मुले आहेत. आरोग्य सेविका पद सेवानिवृत्त झाल्याने रिक्त आहे. सध्या अंगणवाडीचा कारभार मदतनीस चालविते. मुलांना खिचडी, तिखट भात, गोड भात, वरण भात, वटाणे दिले जातात. कधीतर गव्हाची लापसी दिली जाते. सोमवारी मुलांना शिजवून दिलेल्या भातात अळ्या आढळून आल्या. श्रावणी महादेव चौगुले व इतर दोन मुलींच्या खायला भातात अळ्या आढळल्या. मुलांनी खायला दिलेला भात न खाता डब्यात घेऊन पालकांना दाखविला. पालकांनी भात पाहीले असता भातात अळ्या आढळून आल्या.संतप्त झालेल्या पालकांनी याची माहिती सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना दिली. अंगणवाडीला कुलूप घालण्याचा पालकांनी इशारा दिला होता. याची माहिती अंगणवाडी पर्यवेक्षक शैला मुधोळ यांना दिली. आरोग्य सेविका पद रिक्त चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत आरोग्य सेविका पद सेवानिवृत्त झाल्याने वर्षापासून रिक्त आहे. एकात्मिक बालविकास विभागाने आरोग्य सेविकासाठी अर्ज मागविले आहेत. या अंगणवाडीबाबत अनेक वर्षांपासून पालकाच्या तक्रारी आहेत. सात वर्षांपूर्वी शाळा सुटल्यानंतर झोपलेल्या मुलांना अंगणवाडीतच कोंडून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठा वाद झाला होता.

टॅग्स :Sangliसांगली