जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:14+5:302021-04-04T04:28:14+5:30

सांगली : गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक कोरोनाबाधितांची शनिवारी नोंद झाली. दिवसभरात ३०६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच चारजणांचा मृत्यूही झाला ...

Large increase in the number of corona victims in the district | जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

सांगली : गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक कोरोनाबाधितांची शनिवारी नोंद झाली. दिवसभरात ३०६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच चारजणांचा मृत्यूही झाला आहे. १४६ जण कोरोनामुक्त झाले असले तरी वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. दरम्यान, वाळवा तालुका पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून, शनिवारी ७२ रुग्ण आढळले आहेत.

शनिवारी पाच महिन्यांत प्रथमच ३०० पेक्षा जादा रुग्णांची नोंद झाली आहे. सांगली शहरासह कडेगाव, मिरज, खानापूर तालुक्यातील चारजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ७३ रुग्ण आढळले असून, वाळवा तालुक्यातही गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत १४७० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १४५ जण, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १२६२ जणांच्या तपासणीतून १६८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २४७० झाली असून, त्यात २४४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात २२४ जण ऑक्सिजनवर, तर २० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५२५१६

उपचार घेत असलेले २४७०

कोरोनामुक्त झालेले ४८२३६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८१०

शनिवारी दिवसभरात

सांगली ५५

मिरज १८

वाळवा ७२

खानापूर, जत प्रत्येकी २८

आटपाडी २५

मिरज तालुका २४

कडेगाव १६

शिराळा १४

तासगाव ११

कवठेमहांकाळ ८

पलूस ७

Web Title: Large increase in the number of corona victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.