उद्यानासाठी वनीकरणकडून जमिनीचा शोध

By Admin | Updated: February 6, 2015 00:38 IST2015-02-05T23:53:57+5:302015-02-06T00:38:51+5:30

शासनाचा निर्णय : दहा तालुक्यांच्या १० गावांमध्ये उद्यानांची निर्मिती शक्य

Land search for forestry | उद्यानासाठी वनीकरणकडून जमिनीचा शोध

उद्यानासाठी वनीकरणकडून जमिनीचा शोध

अण्णा खोत - मालगाव -शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या एका गावात ग्रामोद्यान उभारण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांत ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सामाजिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गावालगतच्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. या योजनेमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहेच, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत व मुलांची खेळण्याची व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची सोय होणार आहे. ही योजना तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.
शासनाने ग्राम जैवविविधता उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत ज्या गावालगत शासकीय पडजमीन उपलब्ध आहे, अशा जमिनींचे उद्यान निर्मितीच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस, कडेगाव, आटपाडी, शिराळा, वाळवा या नऊ तालुक्यातही ग्रामोद्यान योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातून एकाच गावाची उद्यान निर्मितीसाठी निवड करण्यात येणार असल्याने ज्या गावाकडे गावालगत किमान एक एकर (४० आर) शासकीय पडजमीन आहे, अशा गावांचा सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरु केला आहे. तीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, नक्षत्र वनऔषधी वनस्पतीची लागवड करणे, स्थानिक जैवविविधता संवर्धन करणे, त्याचबरोबर उद्यानामध्ये ग्रंथालय व माहिती केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन ज्या गावात उपलब्ध असेल, त्या गावांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्यान निर्मितीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

तीस लाखांचा निधी
तीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, उद्यान निर्मिती करणे, लहान मुलांसाठी खेळणी उभी करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क, आराम करण्यासाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

Web Title: Land search for forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.