बनावट ओळखपत्राद्धारे जमिनीची खरेदीपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:19+5:302021-02-05T07:24:19+5:30
मिरजेतील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दिनांक १४, १५ व १६ डिसेंबर रोजी मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तीन भूखंडांचे ...

बनावट ओळखपत्राद्धारे जमिनीची खरेदीपत्रे
मिरजेतील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दिनांक १४, १५ व १६ डिसेंबर रोजी मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तीन भूखंडांचे बोगस खरेदीपत्र करण्यात आले आहे. या खरेदीपत्रात जमिनीचे मालक खरेदी देणार बाळासाहेब शंकर शेटे व मधुकर शामराव पाटील यांच्याऐवजी बोगस ओळखपत्रांद्धारे तिऱ्हाईत व्यक्तींना उभे करून तीन खरेदीपत्रे नोंदवून कोट्यवधी रुपये किमतीचे भूखंड हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आधार कार्ड बनवून तीन भूखंड खरेदी दिले आहेत. साक्षीदार व ओळख देणाऱ्यांनीही यासाठी मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रितेन असर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने बोगस खरेदीपत्रांच्या चौकशीचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र बोगस खरेदी देणारा चाैकशीला हजर न राहिल्याने मिरजेचे सह दुय्यम निबंधक श्रीराम कोळी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी चाैकशी करुन बोगस खरेदीपत्राशी संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जमीनींच्या बोगस खरेदी व्यवहारात काही एजंट व मुद्रांक विक्रेतेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. बोगस जमीन खरेदी प्रकरणामुळे मिरजेत खळबळ उडाली आहे.