घराबाहेर ठेवलेल्या पर्समधील ४० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:16+5:302021-02-11T04:29:16+5:30

सांगली : शहरातील हरीपूर राेडवर पर्समध्ये पाणी पडल्याने घराबाहेर ठेवलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविली. या पर्समध्ये अंगठी, कर्णफुले असा ...

Lampas stole Rs 40,000 from a purse kept outside the house | घराबाहेर ठेवलेल्या पर्समधील ४० हजारांचा ऐवज लंपास

घराबाहेर ठेवलेल्या पर्समधील ४० हजारांचा ऐवज लंपास

सांगली : शहरातील हरीपूर राेडवर पर्समध्ये पाणी पडल्याने घराबाहेर ठेवलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविली. या पर्समध्ये अंगठी, कर्णफुले असा ४० हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी अन्माज हुसेन खतीब (वय ५० रा. शास्त्री चौक, हरीपूर रोड, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

हरीपूर रोडवर राहणारे खतीब कुटुंबीय ४ फेब्रुवारी रोजी विवाह समारंभानिमित्त मिरजला गेले होते. ५ रोजी ते घरी परतले. यावेळी पर्समध्ये पाणी पडल्याने त्यांनी ती पर्स घराबाहेर ठेवली होती. या पर्समध्ये अंगठी, कर्णफुले यासह इतर ऐवज होता. शुक्रवारी सकाळी ९ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली. घराबाहेर ठेवलेली पर्स आढळून न आल्याने खतीब कुटुंबीयांना चोरीची कल्पना आली. बुधवारी त्यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Lampas stole Rs 40,000 from a purse kept outside the house