नागावला सासू-सुनेच्या गळ्यातील दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:58+5:302021-08-15T04:27:58+5:30
आष्टा : नागाव (ता. वाळवा) येथे चोरट्यांनी सासू-सुनेच्या गळ्यातील ६५ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख ७५०० रुपये लंपास केले. ...

नागावला सासू-सुनेच्या गळ्यातील दागिने लंपास
आष्टा : नागाव (ता. वाळवा) येथे चोरट्यांनी सासू-सुनेच्या गळ्यातील ६५ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख ७५०० रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील सचिन महादेव सुतार यांच्या घरात शनिवारी पत्नी सुनीता व आई शोभा विश्रांती घेत होत्या. पहाटे मध्यम वयाच्या दोन चोरट्यांनी दाराची कडी उचकटून खोलीत प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील ६३ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे गंठण, साखळी व अंगठी यासह रोख ७५०० रुपये असा एकूण ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. मध्यम वयाच्या दोन चोरट्यांना सचिन सुतार यांनी पाहिले. या चोरीबाबत त्यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते अधिक तपास करीत आहेत.