सांगलीत घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:26+5:302021-02-09T04:29:26+5:30
सांगली : शहरातील अण्णासाहेब पाटीलनगर येथील घर फोडून चोरट्यांनी एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी राजेंद्र ...

सांगलीत घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
सांगली : शहरातील अण्णासाहेब पाटीलनगर येथील घर फोडून चोरट्यांनी एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी राजेंद्र सदाशिव चव्हाण यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंभरफुटी रोडवर असलेल्या अण्णासाहेब पाटीलनगरमध्ये चव्हाण कुटुंबासह राहण्यास आहेत. शनिवारी ते बाहेरगावी गेले होते. या कालावधीत चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील एक लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. रविवारी चव्हाण बाहेरगावहून आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.