विश्रामबागला घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:06+5:302020-12-14T04:39:06+5:30

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील किसान चौक परिसरात असलेले एक बंद घर फोडून चोरट्यांनी रोख २५ हजार रुपयांसह २७ ...

Lampas broke into a house in Vishrambag and stole Rs 1.5 lakh | विश्रामबागला घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

विश्रामबागला घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील किसान चौक परिसरात असलेले एक बंद घर फोडून चोरट्यांनी रोख २५ हजार रुपयांसह २७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रमोद शांताराम विभुते यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विभुते शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घर बंद करून कुटुंबियांसह परगावी गेले होते. त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी संधी साधत घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व बेडरूममधील कपाट फोडून त्यातील २५ हजारांची रोकड, मंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले असे पावणेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. विभुते परगावहून रविवारी सकाळी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.

याप्रकरणी रविवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Lampas broke into a house in Vishrambag and stole Rs 1.5 lakh