बुधगावात घरात घुसून ४६ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:27 IST2021-04-24T04:27:29+5:302021-04-24T04:27:29+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे घरात घुसून चोरट्याने ४६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ...

Lampas broke into a house in Budhgaon and stole Rs 46,000 | बुधगावात घरात घुसून ४६ हजारांचा ऐवज लंपास

बुधगावात घरात घुसून ४६ हजारांचा ऐवज लंपास

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे घरात घुसून चोरट्याने ४६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी वसीम रफिक शेरकर (रा. शेरकर गल्ली, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पाेलिसात फिर्याद दाखल केली आहे.

व्यावसायिक असलेले शेरकर कुटुंबीयासह शेरकर गल्लीत राहण्यास आहेत. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास फिर्यादी वसीम यांचे वडील लघुशंकेसाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर, ते केवळ दरवाजा पुढे करून झोपले. या कालावधीत अज्ञाताने घरात प्रवेश करत कुलूप नसलेल्या तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी ४६ हजार ५०० रुपये लंपास केले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानुसार, फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सांगली ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Lampas broke into a house in Budhgaon and stole Rs 46,000