सोळा हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:27 IST2021-03-26T04:27:17+5:302021-03-26T04:27:17+5:30
----------------------------- मिरजेत घर फोडून चोरी मिरज : मिरजेतील अश्विनी शीतल गांधी यांच्या घरातून अज्ञाताने एक हजार ६०० ...

सोळा हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग लंपास
-----------------------------
मिरजेत घर फोडून चोरी
मिरज : मिरजेतील अश्विनी शीतल गांधी यांच्या घरातून अज्ञाताने एक हजार ६०० रुपये किमतीची सायकल व रोख रक्कम लंपास केली. अश्विनी गांधी या घर बंद करून बाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरात ठेवलेली सायकल, रोख रक्कम चोरून नेल्याचे सुभाषचंद्र गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांत नोंद आहे.
---------------------------
अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी
मिरज : मिरज-सांगली रस्त्यावर मोटारीला पाठीमागून ठोकरल्याने स्वाती संजय लोणकर (वय ४१, रा. मिरज) या जखमी झाल्या. याप्रकरणी मोटारचालक संदीप संजय गोसावी (२१, जयसिंगपूर) व दुचाकीस्वार स्वाती लोणकर या दोघांवर गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज-सांगली रस्त्यावर संदीप गोसावी हा विनावाहन परवाना भरधाव वेगाने मोटार चालवत होता. त्याने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्वाती लोणकर यांच्या दुचाकीची गोसावी याच्या मोटारीला पाठीमागून धडक बसल्याने स्वाती लोणकर या जखमी झाल्या. याबाबत गोसावी व लोणकर या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.