सांगलीत लग्न समारंभावेळी ११ तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST2021-07-18T04:19:05+5:302021-07-18T04:19:05+5:30

सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवर असलेल्या एका हॉलमधील लग्न समारंभावेळी वधू-पक्षाच्या खोलीतून ११ तोळ्यांचे, तीन लाख ८ हजार ...

Lampas with 11 weights of jewelery during the wedding ceremony in Sangli | सांगलीत लग्न समारंभावेळी ११ तोळ्यांचे दागिने लंपास

सांगलीत लग्न समारंभावेळी ११ तोळ्यांचे दागिने लंपास

सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवर असलेल्या एका हॉलमधील लग्न समारंभावेळी वधू-पक्षाच्या खोलीतून ११ तोळ्यांचे, तीन लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी मानसी अमेय जोशी (रा. परांजपे पार्क, सांगली) यांनी आरती रेळेकर (रा. खणभाग, सांगली) व विमल प्रदीप पात्रा (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी शंभर फुटी रोडवरील ऋतुरंग हॉलमध्ये फिर्यादी मानसी जोशी यांच्या नणंदेचा विवाह समारंभ होता. यावेळी फिर्यादी मानसी यांनी वधू पक्षाच्या खोलीत पर्स ठेवली होती. या पर्समध्ये १० तोळ्यांचा सोन्याचा हार व एक तोळ्याचे कानातील झुमके होते. खोलीत कोणी नसल्याचे बघून संशयितांनी अथवा अन्य कोण्या व्यक्तींनी हे दागिने चोरले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार संशयितांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Lampas with 11 weights of jewelery during the wedding ceremony in Sangli