बाप्पाच्या प्रवासासाठी लालपरीही तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:10+5:302021-09-14T04:31:10+5:30
मिरजेत एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील गणेशोत्सवात उदय ठाणेकर या कर्मचाऱ्याने लाल परीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. फोटो १३ संतोष ...

बाप्पाच्या प्रवासासाठी लालपरीही तयार
मिरजेत एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील गणेशोत्सवात उदय ठाणेकर या कर्मचाऱ्याने लाल परीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
फोटो १३ संतोष ०२ : एसटीची प्रतिकृती
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरगुती गणेशोत्सवात प्रत्येक जण आपापल्या परीने रोषणाई आणि सजावट करून उत्सव अधिकाधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यावसायिक संस्थांमधील उत्सवातही कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना बहर येतो. एसटीच्या चंदनवाडीतील विभागीय कार्यशाळेतही कारागीर उदय ठाणेकर यांनी आपल्या मनातील लालपरी हुबेहूब साकारत बाप्पाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आहे.
कार्यशाळेत दर वर्षी गणेशोत्सवत उत्साहात साजरा केला जातो. सर्व जातीधर्मांचे कर्मचारी मनोभावे बाप्पाची आराधना करतात. विसर्जन सोहळाही जल्लोषात होतो, पण यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे मिरवणूक निघणार नाही. असे असले तरी कर्मचाऱ्यांनी उत्सवाचा जल्लोष मात्र कमी होऊ दिलेला नाही. सुंदर रोषणाईसह सजावट केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा उत्सव असल्याने सजावटीमध्ये एसटीचा समावेश अपेक्षितच आहे. हे लक्षात घेऊन कारागिर ठाणेकर यांनी लाल परीचे सुंदर मॉडेल बाप्पासमोर साकारले आहे.
चौकट
उत्सवाचा आनंद द्वगुणित
आठवडाभर कारागिरी ही छोटी लालपरी साकारली. त्यासाठी जुन्या टाकाऊ साहित्याचा वापर केला. एसटीचे प्रत्येक बारकावे प्रतिकृतीमध्ये उतरवले. खिडक्या, फलक, वायपर, दिवे, रंगरंगोटी आदी भाग हुबेहूब आकाराला आले. रंगीबेरंगी दिवेही बसवले. पाहताक्षणी प्रत्यक्षातील एसटीच समोर यावी असा हा देखावा बाप्पाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहे. या कामात त्यांना कार्यशाळेतील सहकाऱ्यांनीही मदत केली.