इस्लामपुरात शिक्षकाला लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:22+5:302021-04-03T04:23:22+5:30

इस्लामपूर : येथील अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलमधील एका शिक्षकाला एका भामट्याने ऑनलाईन पद्धतीने १ लाख ५ हजार ९७० रुपयांचा ...

Lakhs of rupees to a teacher in Islampur | इस्लामपुरात शिक्षकाला लाखाचा गंडा

इस्लामपुरात शिक्षकाला लाखाचा गंडा

इस्लामपूर : येथील अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलमधील एका शिक्षकाला एका भामट्याने ऑनलाईन पद्धतीने १ लाख ५ हजार ९७० रुपयांचा गंडा घातला. ही घटना २७ मार्चला घडली. काल यातील भामट्याविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत रविंदररेड्डी पुल्लारेड्डी गरिमिल्ला (वय ४३, मूळ रा. जवाहरनगर, भूपालपल्ले-तेलंगणा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. २७ मार्चला एका भामट्याने ९८८८३८३९९७४ या मोबाईल क्रमांकावरून गरिमिल्ला यांच्याशी संपर्क साधला. त्याने बँकेतून बोलत असल्याचे सांगत, खाते अपडेट करण्यासाठी पिन क्रमांक माहिती करून घेतला. त्यानंतर काही वेळातच या भामट्याने गरिमिल्ला यांच्या बँक खात्यातील १ लाख ६ हजारांची रक्कम लांबविली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख अधिक तपास करत आहेत.

Web Title: Lakhs of rupees to a teacher in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.