केवायासीच्या नावाखाली वृद्धाला लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:11+5:302021-09-17T04:32:11+5:30
अरविंद गोविंद गुजर (वय ७९, रा. मंगलमूर्ती काॅलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी ...

केवायासीच्या नावाखाली वृद्धाला लाखाचा गंडा
अरविंद गोविंद गुजर (वय ७९, रा. मंगलमूर्ती काॅलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुजर हे मंगलमूर्ती काॅलनीत राहतात. ४ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांना आयडीएफसी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत भामट्याने दूरध्वनी केला. तुमच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट झालेले नाही. ते करणे आवश्यक असल्याची बतावणी केली. भामट्याने गुजर यांच्याकडून ओटीपी मागवून त्यांच्या खात्यातील चारवेळी प्रत्येकी २५ हजार रुपयांची ईकाॅम पर्चेस करीत एक लाख रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुजर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, मोबाईलवर संपर्क साधून ओटीपी घेऊन फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.