शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

चांगभलं! आरेवाडीत लाखांवर भाविकांनी घेतले बिरोबाचे दर्शन, पन्नास कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 15:05 IST

बिरोबाच्या बनात दर्शनासाठी सकाळपासून रांगा

ढालगाव : ‘बिरुदेव-काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, भंडारा- खोबऱ्याच्या उधळणीत, ढोल- कैताळ-सनईच्या गजरात साडेतीन लाखांवर भक्तांनी मंगळवारी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबाचे दर्शन घेतले. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतील भाविकांनी बिरोबाच्या भक्ताला म्हणजेच सूर्याबाला खारा नैवेद्य दाखविला.बिरोबाच्या बनात दर्शनासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. भंडारा- खोबऱ्याची उधळण करत, ढोल- कैताळ-सनईच्या गजरात भाविक मंदिराकडे येत होते. दिवसभरात साडेतीन लाखांवर भक्तांनी दर्शन घेतले.यात्रा कमिटीने भक्तांसाठी दगडी व सिमेंटच्या टाक्या आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या माध्यमातून दहा टँकर दिल्याने पाण्याची सोय झाली होती. सांगली एसटी आगाराने ६० बसची व्यवस्था केली होती. खासगी प्रवासी वाहनांचा वापरही झाला. शिवाय रेल्वेनेही भाविक आले होते. दुचाकी आणि बैलगाड्यांतून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त होती.तीन दिवस चाललेल्या यात्रेत कातडी व्यापारी, मेवामिठाई, हळदी-कुंकू, रसवंतीगृहे, थंड पेये, हॉटेल्स, घोंगडी व्यापारी, किराणा, कलिंगड, करमणूक, नारळ व्यापारी आदींची पन्नास कोटींची उलाढाल झाली.पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० कर्मचाऱ्यांनी भाविकांना रांगेतून दर्शन घेण्यासाठी सहकार्य केले. तहसीलदार बी.जे. गोरे यात्रेवर लक्ष ठेवून होते. महावितरणने अखंडित वीजपुरवठा केला. आरोग्य विभागाने हजारांवर किरकोळ रुग्णांवर उपचार केले. पाणी निर्जंतुकीकरणाकडे या विभागाचे लक्ष होते.आ. गोपीचंद पडळकर, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी भेट दिली. यात्रा समितीचे अध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, सचिव बाळासाहेब कोळेकर, खजिनदार राजाराम कोळेकर, काशीलिंग कोळेकर, भरमू कोळेकर, ग्रामसेवक आनंद पवार यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.थेट यात्रेतून

  • ढालगाव- नागज रस्त्यावर वाहतूक नियोजन करूनही वाहतुकीची कोंडी होत होती.
  • यात्रा काळात भाविकांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मंदिर प्रदक्षिणा मार्गावर मंडप उभारण्यात आला होता.
  • आगळगाव, लंगरपेठ, नांगोळे, ढालगाव, ढालेवाडी, इरळी, अलकूडमार्गे बिरोबा बनात येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागला. कारण दहा वर्षांपासून या रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही. विशेषत: कर्नाटकातून आलेल्या भाविकांना जादा त्रास सहन करावा लागला.
टॅग्स :Sangliसांगली