राजेवाडीच्या युवकाकडून लाखाची औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:54+5:302021-06-01T04:19:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सुभाष सातपुते या युवकाने एक लाख रुपयांची औषधे ...

राजेवाडीच्या युवकाकडून लाखाची औषधे
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सुभाष सातपुते या युवकाने एक लाख रुपयांची औषधे आणि आरोग्य तपासणी साहित्य राजेवाडी, बोंबेवाडी आणि वरकुटे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिले. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने वरकुटे मलवडी (ता. माण) येथील १०० बेड उपलब्ध असलेल्या कोविड सेंटरला व बोंबेवाडी येथील ग्रामपंचायतीला तापमान मशीन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर , हँडवॉश, पाच हजार मास्क, विविध गोळ्या, औषधे दिली. यावेळी धीरज जगताप, प्रशांत खरात, संजय जगताप, सचिन आटपाडकर, सुधीर विभुते, सुनील थोरात, साहेबराव खरात, सरपंच संजय खिलारी, सरपंच विजय जगताप, सचिव भागवत अनुसे उपस्थित होते.