फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:31+5:302021-01-13T05:08:31+5:30

सांगली : शहरातील विजयनगर चौकात असलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी एक लाख ५ हजार १६९ रुपयांची रोकड लंपास ...

Lakhs of cash from the finance company's office | फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून लाखाची रोकड लंपास

फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून लाखाची रोकड लंपास

सांगली : शहरातील विजयनगर चौकात असलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी एक लाख ५ हजार १६९ रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी गौसमुद्दीन सादीक बेगमपल्ली (रा. रामरहीम कॉलनी, शिंदे मळा, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयनगर चौकात फाईव्ह स्टार फायनान्स लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. शुक्रवार ८ राेजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कार्यालय बंद करून कर्मचारी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व टेबलच्या लॉकमध्ये ठेवलेली १ लाखांची रोकड लांबविली. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

Web Title: Lakhs of cash from the finance company's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.