कडेगाव तालुक्यात व्हेंटिलेटरचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:03+5:302021-05-19T04:27:03+5:30
कडेगाव व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, येथे ...

कडेगाव तालुक्यात व्हेंटिलेटरचा अभाव
कडेगाव व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात
प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, येथे एकही व्हेंटिलेटर नाही. यामुळे
व्हेंटिलेटरची गरज लागल्यास कडेपूर येथील खासगी रुग्णालयात किंवा तालुक्याबाहेर सांगली, इस्लामपूर
किंवा कऱ्हाडला पाठवावे लागत आहे.
तेथे अचानक व्हेंटिलेटर बेड मिळत नाही.
आतापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत
साठ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडेगाव व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता होणे गरजेचे आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठ आणि रुग्णालयाच्या माध्यमातून
सुरू केलेल्या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, व्हेंटिलेटर बेडची सुविधा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
८२० रुग्ण उपचाराखाली
कडेगाव तालुक्यात तीन हजारांहून अधिक रुग्ण
कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या ८२० रुग्ण उपचाराखाली आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू नसलेल्या खासगी रुग्णालयात लाखोंचे बिल भरणे शक्य होत नाही.