अंकलगीत काेराेना लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:29+5:302021-04-19T04:24:29+5:30

माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथे कोरोनाची लस कमी पडत असल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. त्वरित येथे लस ...

Lack of vaccine carnea vaccine | अंकलगीत काेराेना लसीचा तुटवडा

अंकलगीत काेराेना लसीचा तुटवडा

माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथे कोरोनाची लस कमी पडत असल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. त्वरित येथे लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बसवराज काकंडकी यांनी केली आहे.

अंकलगी गावात दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात लस उपलब्ध असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. मात्र जवळपासच्या वाडी-वस्तीवरील लोक लस घेण्यासाठी आरोग्य उपकेंद्राकडे गेले असता, लोकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पुरेशा लसी उपलब्ध नसतील, तर दवंडी देण्याची गरजच काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. अनेक लोक पाच-सहा किलोमीटरचे हेलपाटे मारून परत गेले. अंकलगी गावासाठी पूर्ण क्षमतेने लसींचा पुरवठा करावा, अन्यथा प्रशासनाला जाब विचारू, असा इशारा बसवराज काकंडकी यांनी दिला आहे.

Web Title: Lack of vaccine carnea vaccine