शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत कृष्णा नदीत पाच परप्रांतीय मजूर बुडाले; दोघांचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:33 IST

मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीत बुडाल्याने रामस्वरूप यादव (वय २३), जितेंद्र यादव (वय २१, रा. जयपूर) या दोन ...

मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीत बुडाल्याने रामस्वरूप यादव (वय २३), जितेंद्र यादव (वय २१, रा. जयपूर) या दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. बुडणाऱ्या एकास वाचविण्यात आले. महापालिका अग्निशामक दल व आयुष सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहा तास नदीपात्रात शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.फरशी फिटिंगकाम करणारे राजस्थानी मजूर मिरजेतील सुभाषनगर रोड दत्तनगर येथे गेले वर्षभर वास्तव्यास आहेत. गुरुवारी कामाला सुटी असल्याने सकाळी कृष्णाघाटावर नदीत कपडे धुण्यासाठी पाच जण गेले होते. नदीपात्रात कपडे धुवून रामस्वरूप यादव, जितेंद्र यादव व रामकुमार मुरलीधर यादव हे तिघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडू लागले.

त्यांच्या आरडाओरडामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या ओम सूरज पाटील या तरुणाने पाण्यात उडी मारून सुनील यादव या एकास बाहेर काढले. मात्र, रामस्वरूप व जितेंद्र यादव हे दोघेजण खोल पाण्यात बुडाले.बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी मिरज अग्निशमन दल व आयुष्य सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. बुडालेल्या दोघांना शोधण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून अग्निशामक दलाच्या बोटीतून नदीपात्रात शोध कार्य सुरू झाले. दुपारी एक वाजता रामस्वरूप यादव याचा मृतदेह सापडला. दुपारी चार वाजता जितेंद्र यादव याचाही मृतदेह शोधण्यात आला. मृत रामस्वरूप यादव हा वाचलेल्या रामकुमार मुरलीधर यादव याचा सख्खा भाऊ आहे. पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे तिघांच्याही अंगलट आले. रामकुमार मुरलीधर यादव याचे नशीब बलवत्तर असल्याने तो बचावला. मात्र, त्याच्या भावासह दोघांचा जीव गमवावा लागला. नदीपात्रात शोधकार्य सुरू असताना घाटावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत गांधी पोलिस चौक पोलिसात नोंद असून सहायक निरीक्षक नितीन कुंभार, हवालदार चंद्रकांत जाधव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू