शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कामगार विश्वात अस्वस्थता, अस्थिरतेचा धूर- कामगार क्षेत्रात पगाराची समस्या-कामगार विशेष दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:25 IST

सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे.

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्यातील कामगारांची संख्या ६ लाखाच्या घरात : बेरोजगारांचे प्रमाण वाढले;

अविनाश कोळी ।सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगारांची संख्या ६ लाखाच्या घरात असली तरी, यातील २५ टक्के कामगारांनासुद्धा कायमस्वरुपी रोजगाराची खात्री मिळत नाही. कष्ट व कौशल्याच्या कोणत्याही कामात कामगारांना पुरेसा पगार मिळत नसल्याने दारिद्र्याची मिठी अधिकच घट्ट होत आहे.

सांगली जिल्ह्याचा निम्मा भाग सधन, तर निम्मा दुष्काळी आहे. त्यामुळे रोजगाराचे चित्रही असेच विभागले गेले आहे. कामगारांच्या एकूण संख्येचा विचार केला, तर यामध्ये शेतमजूर, व्यापार आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार अधिक आहेत. एमआयडीसी व त्यातील उद्योगांची संख्या मर्यादित राहिल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कामगार वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थांचे बुरुज ढासळत असल्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. अशा चारही बाजूंनी कामगारविश्वाला हादरे बसत आहेत.

जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालातील आकडेवारीचा अभ्यास केल्यास, रोजगार निर्मितीचा मोठा प्रश्न जिल्ह्यासमोर उभा राहिल्याचे दिसून येईल. सध्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडील नोंदीचा अंदाज घेतला, तर बेरोजगारांची संख्या दीड लाखावर गेली आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी आहे. बेरोजगाराची समस्येवर उपाययोजना शोधण्याची गरज भासू लागली आहे. एकूणच प्रत्येकवर्षी कामगार विश्वातील परिस्थिती अधिकच बिकट व चिंताजनक होत असल्याचे दिसत आहे.काम करणाऱ्यांची वर्गवारीजिल्ह्यातील २0११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोक काम करणारे आहेत. ५ टक्के हंगामी किंवा सीमांतिक काम करणारे आहेत. एकूण काम करणाºयांमध्ये ४0 टक्के शेतकरी, २३ टक्के शेतमजूर, ३ टक्के उद्योग व सेवा क्षेत्रात, तर ३४ टक्के व्यापार व अन्य व्यवसायात काम करणारे आहेत.बांधकाम क्षेत्रातही नाराजीसध्या बांधकाम क्षेत्रात काम करणाºया कामगारांची संख्या सुमारे २ लाखाच्या घरात आहे. शासकीय लाभ प्राप्त करून घेणाºया नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या केवळ १५ हजाराच्या घरात आहे, अशी माहिती बांधकाम कामगारांचे नेते कॉ. शंकर पुजारी यांनी दिली.दुकाने, व्यापारी संस्था व अन्य कामगारदुकाने १३,0१९व्यापारी संस्था ३0,२५0हॉटेल्स ५,६७२चित्रपटगृहे २२0इतर संस्था ५५४एकूण ४९,७१५उद्योग क्षेत्रातीलसंख्यानोंदणीकृत कारखाने ९१0बंद अवस्थेत ७५प्रपत्र सादर केलेले ३१0कामगारांची संख्या २२,४४८महिला कामगार १,७६४अंशकालीन, रोजंदारीवरील व इतर कामगारशासकीय संस्था-१,१६२, जिल्हा परिषद-५,८४७नगरपरिषदा-६८

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा