मालगावसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:31+5:302021-05-31T04:20:31+5:30
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील लोकसंख्येचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी आरोग्य ...

मालगावसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मजूर करा
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील लोकसंख्येचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे मालगाव येथील शिष्टमडळाने केली. या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
मालगाव येथील ४० हजार लोकसंख्येच्या गावासाठी आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयाची मागणी आहे. मात्र यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या सुविधा कमी लोकसंख्येच्या गावास मंजूर झाल्याने मालगाव गाव उपेक्षित राहिले. यामुळे मालगावला आरोग्य केंद्र आणि एमबीबीएस पदवीचे डॉक्टर उपलब्ध व्हावेत, अशी मागणीही शिष्टमंडळाने आरोग्य राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.
पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब धामणे, जि. प. चे माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने, सरपंच अनिता क्षीरसागर, शशिकांत कनवाडे, कपिल कबाडगे, शबाना मुजावर, राजू माळी, गंगाधर तोडकर, विजय आवटी, विश्वास खांडेकर, मयूर नाईकवडी, महेश कोकणे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.