मदतीच्या तत्परतेबद्दल कामगार आयुक्तांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:47+5:302021-09-14T04:31:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्करोगग्रस्त कामगार जावेद आब्दुल आलासे यांच्या उपचारासाठी कल्याणकारी योजनेतून तत्काळ १ लाख आर्थिक मदत ...

मदतीच्या तत्परतेबद्दल कामगार आयुक्तांचा सत्कार
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्करोगग्रस्त कामगार जावेद आब्दुल आलासे यांच्या उपचारासाठी कल्याणकारी योजनेतून तत्काळ १ लाख आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे म्हणाले की, आलासे हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. त्यांचे कुटुंबही या संकटाने चिंतित होते. त्यांना या शासन मदतीने मायेचा आधार मिळाला. तसेच कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठीही मदत मंजूर करून कामगारांच्या मुलांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न मंडळामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघामार्फत गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी संजय संपत कांबळे, युवराज कांबळे, वसंत भोसले, विक्रांत सादरे, अनिल आंखलखोपे, सहदेव कांबळे, शिवकुमार वाली, कुमार सुतार, संजय चव्हाण, संतोष माने आदी उपस्थित होते.