कुसुमताईच्या स्नेहल मोहिरेचे आयआयटी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST2021-03-27T04:27:09+5:302021-03-27T04:27:09+5:30
इस्लामपूर येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयातील स्नेहल मोहिरे हिचा प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकमत न्यूज ...

कुसुमताईच्या स्नेहल मोहिरेचे आयआयटी परीक्षेत यश
इस्लामपूर येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयातील स्नेहल मोहिरे हिचा प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समार्फत फेब्रुवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जाम (जाएंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) या परीक्षेत श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल सुनील मोहिरे हिने देशात २७६ वा क्रमांक मिळवीत देशपातळीवर देदीप्यमान यश मिळविले.
या परीक्षेत स्नेहलने रसायनशास्त्र विषयात हे यश मिळविले. तिला आयआयएससी, आयआयटी, आयआयएसईआर, आयएसईआर, जेएनसीएएसआर, एनआयटी अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये पदव्युत्तर, संशोधनाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
तिला विभाग प्रमुख डॉ. आर. के. माने, प्रा. एस. आर. शाळगावकर, प्रा. व्ही. डी. सोनवणे, प्रा. वर्षाराणी मोरे, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. एस. ए. जमदाडे, डॉ. नीता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत व सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी तिचे स्वागत केले.