शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला कुपवाडला संमिश्र पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:39+5:302020-12-09T04:21:39+5:30

कुपवाड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी शहरात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर ...

Kupwad's mixed support for farmers' 'Bharat Bandh' | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला कुपवाडला संमिश्र पाठिंबा

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला कुपवाडला संमिश्र पाठिंबा

कुपवाड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी शहरात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी संघटना, संघर्ष समिती यासह विविध सामाजिक संघटनांनी कुपवाड बंदचे काटेकोर नियोजन केले. त्यानुसार ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या शहरातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कुपवाड शहर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून सर्व व्यापारी बांधवांनी बंदला पाठिंबा दिला. शहरातील मोक्याची ठिकाणे वगळता उपनगरातील काही भागामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी अंतर्गत व्यवहार व भाजीपाला बाजारपेठा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी आंदोलकांनी मोटारसायकल रॅलीद्वारे शासनाच्या कायद्याविरुद्ध जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या. शहरातील सकाळपासून बंद असणारी काही दुकाने दुपारी बारानंतर उघडण्यात आली. बंद काळातही वाहनांची वाहतूक कायम होती.‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरून विनामास्क वावरणाऱ्यांची संख्या जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात असूनही अधिक प्रमाणात होती.

फोटो ०८कुपवाड०१/ओळ :

कुपवाडमध्ये शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकातील दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली होती.

Web Title: Kupwad's mixed support for farmers' 'Bharat Bandh'