शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Sangli: सावळीत गॅसचा काळाबाजार, तिघांना अटक; कुपवाड पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:01 IST

साडेपाच लाखांचे गॅस सिलिंडर, मशीन, मोटर, वजनकाटा जप्त

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील एन. डी. माऊली एच. पी. गॅस एजन्सी या ठिकाणी घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणाऱ्या बेकायदेशीर केंद्रावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५ लाख ३१ हजार ८८० रुपयांचे भरलेले व रिकामे गॅस सिलिंडर, मशीन, मोटर, वजनकाटा असे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.चंद्रकांत संभाजी कोळेकर (वय ३६, रा. सह्याद्रीनगर, दत्तमंदिर जवळ, सांगली), मनोजकुमार जबराराम बिश्नोई (२०, रा. एच. पी. गॅस गोडावूनशेजारी, गजवर्धन पार्क, ज्ञानगिरी वसाहत, सावळी मूळ गाव रा. गोगादेवगड ता. सेखला, जि. जोधपूर, राजस्थान), रेवनकुमार सुरेंद्र महाजन (२९, रा. प्लॉट नं. २, वसंत कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत, तर एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.सावळी (ता. मिरज) येथील एन. डी. माऊली एच. पी. गॅस एजन्सी या ठिकाणी बेकायदेशीर घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात आहे, अशी माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मिरजेच्या तहसीलदारांना पत्र देऊन कारवाईसाठी पुरवठा निरीक्षकांची मागणी केली. पुरवठा निरीक्षक रघुनाथ कोळी यांच्या उपस्थितीत कुपवाड पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. यावेळी बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या १४ किलोंच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या १९ किलोंच्या सिलिंडरमध्ये एसटीपी मशीनच्या साहाय्याने गॅस भरत असल्याचे आढळले.गोडावूनमधील ६७ हजार ४३० रुपयांचे १४ किलोंचे २१ भरलेले सिलिंडर आणि २४ मोकळे सिलिंडर, ५ अर्धवट भरलेले सिलिंडर त्यातील एका सिलिंडरला एसटीपी मशीनची पाईप लावलेली होती. तसेच २ लाख २९ हजार रुपयांचे १९ किलोंचे २० भरलेले सिलिंडर, १९ किलोंचे ६४ रिकामे सिलिंडर, १९ किलोंचे ३ अर्धवट भरलेले सिलिंडर. २ लाख १३ हजार ६५० रुपयांचे ४७ किलोंचे २ भरलेले सिलिंडर, ४७ किलोचे ७९ मोकळे सिलिंडर, एस.टी.पी. मशीन, विद्युत मोटार. हिटर, वजन काटा असा एकूण ५ लाख ३१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. उपनिरीक्षक विश्वजित गाडवे तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली