कुपवाड खूनप्रकरण; सहाजणांना अटक
By Admin | Updated: January 24, 2016 00:37 IST2016-01-24T00:29:06+5:302016-01-24T00:37:02+5:30
तीन अल्पवयीन : २७ पर्यंत कोठडी

कुपवाड खूनप्रकरण; सहाजणांना अटक
कुपवाड : येथील साजन सरोदे या तरुणाच्या खूनप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून रेकॉर्डवरील सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बंड्या ऊर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे (वय २८), गजानन प्रकाश गवळी (२४), हणमंत आनंदा कांबळे (२०), आप्पा ऊर्फ सीताराम पांडुरंग मोरे (१९), लोकेश ऊर्फ आकाश लक्ष्मण जाधव (१९), संभाजी बाबासाहेब रूपनर (२१, सर्व रा. कुपवाड) या रेकॉर्डवरील संशयित हल्लेखोरांचा समावेश आहे. उर्वरित अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. साजन सरोदे या तरुणाचा गेल्या आठवड्यात रेकॉर्डवरील सहा संशयितांकडून खून करण्यात आला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. संशयितांना न्यायालयाकडून २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. तीन अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
अखेर सापळ्यात अडकले
शुक्रवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकावर साफळा रचून संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक भवड, धनंजय चव्हाण, प्रवीण यादव, विश्वास वाघमोडे, नितीन कुरणे, कृष्णा गोसावी, महेश जाधव, बाळू डांगे, योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.